जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५०४ वर
औरंगाबाद जिल्ह्यात आज पुन्हा १६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५०४ वर गेली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १६६ रुग्णांमध्ये शहरातील १०१ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९० पुरूष तर ७६ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५०४ वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी ४०३३ रुग्ण बरे झालेले असून ३३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सध्या ३१४१ जणांवर उपचार सुरू आहे.
शहरातील १०१ रुग्ण या भागातील
शहरात आज कोरोनाचे १०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कांचनवाडी १, मार्ड हॉस्टेल परिसर १, पदमपुरा १, अविष्कार कॉलनी एन सहा १, जटवाडा रोड १, जयसिंगपुरा २, रामनगर १, बालाजीनगर १, शुभमंगलविहार १, विशालनगर २, एन बारा सिडको १, एन नऊ सिडको २, स्वामी विवेकानंदनगर ४, रमानगर ९, विठ्ठलनगर ३, रेणुकानगर ३, अमृतसाई प्लाजा २, जयभवानीनगर १, एन बारा हडको १, पवननगर १, किर्ती सोसायटी ३, रायगडनगर ९, मिसारवाडी १, म्हाडा कॉलनी १, सातारापरिसर २, गजानन कॉलनी १, चिकलठाणा १, एन अकरा, सिडको १, मुकुंदवाडी १, संजयनगर १, अजबनगर ६, गजानननगर २, श्रद्धा कॉलनी १, लक्ष्मीकॉलनी २, भक्तीनगर ४, शिवशंकर कॉलनी १, हनुमाननगर १, अरिहंतनगर ३, बंजाराकॉलनी १, शिवाजीनगर १, जाधववाडी ३, पुंडलिकनगर १, खोकडपुरा ७, नारेगाव २, सेव्हनहिल १, टाईम्सकॉलनी १, रामनगर १, जाधववाडी १, विजयनगर १, गजानननगर, गारखेडा परिसर १ या भागातील रुग्ण आढळून आले.
ग्रामीण रुग्ण ६५ रुग्ण या भागातील
ग्रामीण भागात आज ६५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कन्नड १, जाकीर हुसेननगर, सिल्लोड १, अजिंठा १, गोकुळधाम सोसायटी बजाजनगर ६, नेहा विहार, सिडको महानगर, बजाजनगर ४, जय भवानी चौक, बजाजनगर ४, गणेश सोसायटी बजाजनगर १, जगदंबा सोसायटी वडगाव १, सिडको वाळूज महानगर एक २, फुलेनगर, पंढरपूर १, सूर्यवंशी नगर, बजाजनगर १, द्वारकानगरी, बजाजनगर १, एकदंत रेसिडन्सी, बजाजनगर १, बाळासाहेब ठाकरे चौक, बजाजनगर २, संगम नगर, बजाजनगर ५, वडगाव, बजाजनगर २, वळदगाव, बजाजनगर २, नंदनवन सोसायटी बजाजनगर २, सारा किर्ती, बजाजनगर १, नवजीवन सोसायटी बजाजनगर २, न्यू सह्याद्री सोसायटी मोरे चौक, बजाजनगर १, वंजारवाडी ८, शिवशंभो सोसायटी बजाजनगर १, सावतानगर, रांजणगाव १, हतनूर, कन्नड १, नागापूर, कन्नड १, कारडी मोहल्ला, पैठण ३, कुंभारवाडा, पैठण ८ या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.















